राज्याचे राजकारण विकासाभिमुख.. ते विकासात्मक असेच सुरु राहणार…

उद्योगमंत्री उदय सामंत ; मंत्री दीपक केसरकर व राजन तेली यांना एकत्र आणल हेच तुझ्या कार्यक्रमाचे यश…

⚡सावतवाडी ता.१५-: राज्याचे राजकारण हे विकासाभिमुख आहे आणि ते यापुढेही विकासात्मक असेच सुरु राहील. मात्र असे असले तरी सिंधुदुर्गचा सुपुत्र म्हणून या नात्याने या जिल्ह्यासाठी जे जे करता येईल ते निश्चितच करेन आश्वासन राज्याचे उद्योगमंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे माजी पालकमंत्री उदय सामंत यांनी आज येथे आयोजित कार्यक्रमात दिले.
तर आज जरी मी महाराष्ट्र राज्याचा उद्योगमंत्री असलो तरी विशाल परब यांच्यासारखाच कष्टाने लहानाचा मोठा झालो. त्यामुळे मेहनतीचे फळ हे चांगलेच असते त्यामुळे युवाईने भविष्यात मोठीच स्वप्न पाहावीत असेही ते म्हणाले. तसेच प्रत्येक तालुक्यात मंत्री दीपक केसरकर राजन तेली यांना या कार्यक्रमानिमित्त एकत्र आणले हेच तुझं मोठं यश आहे अशा शब्दात त्यांनी चिमटा देखील काढला.

युवा उद्योजक विशाल परब याच्या वाढदिनी आयोजित सावंतवाडी येथील कार्यक्रमाला त्यांनी उपस्थिती दर्शवित विशाल परब यांना शुभेच्छा दिल्या यावेळी ते बोलत होते.

You cannot copy content of this page