‘राष्ट्रवादी ‘ च्या मेळाव्याची दोडामार्गमधून जंगी तयारी

सावंतवाडीत उद्या मेळावा;सुरेश दळवी करणार नेतृत्व

⚡दोडामार्ग ता.१२-:
सावंतवाडी येथे उद्या होणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्याचे नियोजन करण्यासाठीची बैठक राष्ट्रवादीचे नेते सुरेश दळवी यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी येथे झाली.मेळावा न भूतो न भविष्यति असा करण्याचा निर्धार कार्यकर्त्यांनी केला

सावंतवाडी येथे पक्ष प्रभारी माजी मंत्री बाळासाहेब पाटील यांच्या उपस्थितीमध्ये शुक्रवारी (ता.13) मेळावा होणार आहे.
सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाच्या वतीने होणाऱ्या बैठकीमध्ये सावंतवाडी तालुक्यातील जास्तीत जास्त पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उपस्थित राहण्यासाठी नियोजन करण्यात आले.

                           माजी केंद्रीय कृषी मंत्री तथा पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवणाऱ्या एकनिष्ठ कार्यकर्त्यांचा हा मेळावा आहे. या मेळाव्यासाठी जास्तीत जास्त पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या सिंधुदुर्ग कोकण विभागीय अध्यक्ष अर्चना घारे - परब यांनी केले आहे. 

                    नियोजन बैठकीसाठी जेष्ठ मार्गदर्शक सुरेश दळवी, जिल्हा उपाध्यक्ष संदीप गवस, तालुकाध्यक्ष प्रदीप चांदेलकर, शहराध्यक्ष सुदेश तुळसकर, युवक अध्यक्ष गौतम महाले, ओबीसी सेल तालुकाध्यक्ष उल्हास नाईक, सावंतवाडी तालुका युवक उपाध्यक्ष विवेक गवस, विलास सावळ आदी पदाधिकारी उपस्थित होते.
You cannot copy content of this page