⚡कणकवली ता.१२-:
माहेर वाशीणींच्या हाकेला धावणारी, नवसाला पावणारी अशी ख्याती असलेल्या सौंदाळे येथील श्री नवलादेवी मंदिरात नवरात्रोत्सवानिमित्त विविध कार्यक्रम १५ ते २४ ऑक्टोबर २०२३ या कालावधीत होणार आहेत.
या संपूर्ण कार्याक्रमामध्ये पालखी मिरवणूक आदी कार्यक्रम घेण्यात येणार आहेत. पालखी हा कार्यक्रम डोळे दिपून जातील असा असतो. मंदिराभोवती रोज पाच फेऱ्या, ढोल वाद्य, टाळ, मृदुंगाच्या गजरात नाचणारी भक्त मंडळी खरोखरच त्या पाच फेऱ्या बघणाऱ्या भाविकांचे डोळे अक्षरशा दिपून जातात.
रोज भक्तिमय वातावरणातील पालखी मिरवणूक, भजने, नाटके, लेझीम पथक, गरबा, दांडिया, ढोल पथक, कीर्तने, भजनांची डबल बारी, त्याच प्रमाणे महिला भजनांचा सुश्राव्य डबलबारी जंगी सामना आणि सुवासिनींच्या ओटी भरण्याचे कार्यक्रम. त्याचप्रमाणे अष्टमी दिवशी होम हवन, सत्य नारायणाची महापूजा आदी कार्यक्रम असतात. वरील सर्व कार्यक्रमांचा श्रद्धेने लाभ घ्यावा व देवीचा आशीर्वाद घेवून कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहन श्री नवलादेवी जीर्णोद्धार समितीचे विद्यमान अध्यक्ष कृष्णाशेठ मिठबावकर, विद्यमान गावप्रमुख माणिकशेठ ताम्हणकर, विद्यमान मानकरी मंडळी, विद्यमान मुंबई मंडळ आणि विद्यमान व सर्व ग्रामस्थ मंडळींनी केले आहे.
