⚡वेंगुर्ला ता.१२-: वेंगुर्ला तालुका राष्ट्रीय काँग्रेस ओबीसी सेल तालुकाध्यक्ष पदी आरवली येथील उत्तम आत्माराम चव्हाण यांची नियुक्ती ऑल इंडिया काँग्रेस कमिटीचे चेअरमन राजेश लोलीतीया यांनी जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष इर्शाद शेख यांच्या शिफारशीनुसार केली आहे.
उत्तम चव्हाण यांनी यापूर्वी राष्ट्रीय काँग्रेसचे वेंगुर्ल तालुका सचिव, चर्मकार समाज उन्नती मंडळ वेंगुर्ल्याचे सलग १० वर्षे अध्यक्ष, चर्मकार समाज उन्नती मंडळाचे जिल्हा उपाध्यक्ष, अ.भा.कॉ.अनुसूचित जाती जिल्हा अध्यक्ष म्हणून काम केले आहे. त्यांच्या या निवडीबद्दल त्यांचे अभिनंदन होत आहे.
फोटो – उत्तम चव्हाण
