⚡वेंगुर्ला ता.१२-: मातोश्री कला क्रिडा मंडळातर्फे १५ ते २४ ऑक्टोबर २०२३ या कालावधीत दाभोली नाका-वेंगुर्ला येथे सार्वजनिक नवरात्रोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. १४ ऑक्टोबर रोजी सायंकाळी दुर्गामातेचे सवाद्य मिरवणूकीने आगमन तर नवरात्रोत्सवा दरम्यान रोज सकाळी ९ वाजता दुर्गा मातेची नित्य पूजा, दुपारी १२ वा. नित्य नैवेद्य आणि सायंकाळी ६.३० वा. भजन व नित्य महाआरती होणार आहे.
दि. १५ ऑक्टोबर रोजी रात्रौ ८ वा. चेंदवणकर-गोरे पारंपारिक दशावतार नाट्य मंडळ, कवठी प्रस्तुत दर्जेदार नाट्यपुष्प ‘कोल्हापूर महिमा‘, दि.१६ रोजी रात्रौ ८ वा. नाईक दशावतार नाट्यमंडळ झरेबाबंर-दोडामार्ग प्रस्तुत ‘नियती‘ हा महान पौराणिक नाट्यप्रयोग, दि.१७ रोजी रात्रौ ८ वा. ५ ते ८ व ९ ते १२ वयोगटामध्ये ‘फॅन्सीड्रेस स्पर्धा‘, रात्रौ ९ वा. फुगडी व दांडिया, दि. १८ रोजी रात्रौ ८ वा. ‘मान पैठणीचा‘ हा महिलांसाठी विशेष कार्यक्रम, दि.१९ रोजी सायंकाळी ५ वा. हिदू धर्माभिमानी चैत्र नवमी महिला ग्रुप वेंगुर्ला यांचा सामुहिक ‘महालक्ष्मीष्टक स्तोत्र व अन्नपूर्णा स्तोत्र‘ पठण, रात्रौ ८ वा. सांस्कृतिक कार्यक्रम, दि.२० रोजी रात्रौ ८ वा. जिल्हास्तरीय खुली रेकॉर्ड डान्स स्पर्धा, दि.२१ रोजी रात्रौ ८ वा. दांडिया, रात्रौ ९ वा. सांस्कृतिक कार्यक्रम, दि.२२ रोजी रात्रौ ८ वा. दांडिया, रात्रौ ९ वा. सांस्कृतिक कार्यक्रम
दि.२३ रोजी स. ९ वा. श्रीसत्यनारायण महापूजा, तिर्थप्रसाद, रात्रौ ८ वा. विविध स्पर्धांचे बक्षिस वितरण, रात्रौ ८.३० ऑर्केस्ट्रा ‘सप्तसूर‘, दि.२४ रोजी सायंकाळी ४ वाजता महाआरती, त्यानंतर दाभोली नाका -पिराचा दर्गा-श्रीराम मंदिर मार्ग-गाडीअड्डा नाका-बाजारपेठ – जुने बस स्थानक ते मांडवी खाडी येथे मिरवणूकीने दुर्गामातेचे विसर्जन केले जाणार आहे. दुर्गा मातेच्या दर्शनाचा तसेच सर्व कार्यक्रमांचा लाभ घ्यावा असे आवाहन मातोश्री कला-क्रिडा मंडळातर्फे नवरात्रोत्सव समितीतर्फे केले आहे.
