बांदा कट्टा येथे म महामार्गावर सुरु असलेल्या उड्डाणपुलाच्या कामासाठी अतिक्रमण हटविण्यास सुरू…

पावसाळ्यात कामास झाले होते प्रारंभ:उड्डाणपुलाच्या कामाला वेग..

⚡बांदा ता.१२-: बांदा कट्टा येथे मुंबई-गोवा महामार्गावर सुरु असलेल्या उड्डाणपुलाच्या कामासाठी आजपासून अतिक्रमण हटविण्यास सुरुवात करण्यात आली. महामार्गाच्या दुतर्फा अनेक स्टॉल उभारण्यात आले असून उड्डाणपुलाच्या सीमांकनानुसार अतिक्रमण काढण्यात आले आहे.

बांदा येथे ६०० मिटर लांबीचे मोठे उड्डाणंपूल होत आहे. पावसाळ्यात कामास प्रारंभ करण्यात आला. सुरुवातीला गोवा बाजूकडून काम सुरु करण्यात आले. कट्टा कॉर्नर येथे स्टॉल उभारण्यात आल्याने हे स्टॉल काढण्यासाठी ठेकेदार कंपनीने मुदत दिली होती. बहुतांश दुकानदारांनी स्वतःहून सहकार्य करत स्टॉल हटविले होते.

काही बांधकाम शिल्लक राहिल्याने आज ठेकेदार कंपनीने जेसीबीच्या साहाय्याने अतिक्रमण काढले. यामुळे उड्डाणपुलाच्या कामाला वेग येणार असून युद्धापातळीवर कामास सुरुवात करण्यात येणार आहे.

You cannot copy content of this page