पी.एफ. डॉन्टस यांच सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक क्षेत्रात योगदान चिरंतन राहील…

मंत्री दिपक केसरकर:सावंतवाडीतील शोकसभेत विविध क्षेत्रातील मान्यवराकडून आदरांजली..

⚡सावंतवाडी ता.१२-: सिंधुदुर्ग जिल्ह्याला लाभलेली सैनिकी परंपरा आदर्शपणे जपण्याचं महान कार्य दिवंगत पी. एफ. डॉन्टस यांनी केलं आहे. त्यांचं सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक क्षेत्रात योगदान चिरंतन राहील. देशाच्या अशा आदरणीय आणि वंदनीय सैनिकाला सॅल्यूट करणे माझं कर्तव्य मानतो अशा भावपुर्ण शब्दात शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी आज येथे त्यांना श्रद्धांजली व्यक्त केली.
सावंतवाडी येथील नवसरणी सभागृहात स्व. पी. एफ. डॉन्टस यांच्या शोकसभेत ते बोलत होते.

यावेळी व्यासपीठावर माजी राज्यमंत्री प्रवीण भोंसले, माजी खासदार ब्रिगेडीअर सुधीर सावंत, फादर मिलेट डिसूझा, राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोकण महिला प्रदेश अध्यक्षा अर्चना घारे -परब, एम. डी. देसाई, बाबुराव कविटकर, रुजॉय रोड्रिक्स,राष्ट्रवादी काँगेसचे तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी, माजी नगराध्यक्ष अॅड. दिलीप नार्वेकर, बबन साळगावकर माजी नगराध्यक्षा अनारोजिन लोबो, माजी उप नगराध्यक्षा अन्नपूर्णा कोरगावकर, राष्ट्रीय काँग्रेसच्या महिला जिल्हाध्यक्षा साक्षी वंजारी, शिंदे गट शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष अशोक दळवी, मायकल डिसोजा, राजू मसुरकर,रविद्र मडगावर आदी उपस्थित होते. शोक सभेची सुरुवात स्वर्गीय पी.एफ. डान्टस यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आली.

ब्रिगेडियर श्री सावंत म्हणाले, माझे मित्र सहकारी पी एफ डॉन्टस यांचे निधन आजही मनाला न पचणारे आहे. सैनिकी सेवेतून निवृत्त झाल्यानंतर सहकार राजकीय सामाजिक क्षेत्रात त्यांनी काम करून माणसं घडवण्याचं काम केलं. समाजासाठी समाजातील घटकांसाठी काम करत असताना कधीही स्वतःला डाग लागू नये याची काळजी त्यांनी घेतली. एकत्र काम करत असताना भविष्यात मोठा रोजगार देणारा उद्योग आणण्याचा आमचा उद्देश होता मात्र हे काम अपुरे राहीले. त्यांनी सहकार क्षेत्रात उभ्या केलेल्या संस्था आणि त्यांचे अपूर्ण राहिलेले काम त्यांचे चिरंजीव जॉय डाॅन्टस त्यांचे शिष्य यांनी एकत्र येऊन पुढे नेऊया.

या शोकसभेला काँग्रेसचे तालुकाध्यक्ष महेंद्र सांगेलकर, समीर वंजारी, एक्स सर्व्हिसेस लीगचे जिल्हाध्यक्ष शशिकांत गावडे, दिनानाथ सावंत, माजी सैनिक तातोबा गवस, डॉ. विलास सावंत, कॅथलिक बँकेचे सीईओ जेम्स बोर्जेस, सैनिक स्कूलचे दिपक राऊळ, चंद्रशेखर जोशी, सुरेश भोगटे, फ्रान्सिस रोड्रिक्स, नीरज देसाई, कर्नल विजयकुमार सावंत, दिलीप भालेकर, बाळासाहेब बोर्डेकर, रमेश बोंद्रे, जिल्ह्यातील आजी – माजी सैनिक, डॉन्टस कुटुंबीय तसेच सामाजिक, शैक्षणिक, सहकार, राजकीय क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते.

You cannot copy content of this page