⚡कणकवली ता.१२-:
मालवण तालुकास्तरीय मैदानी स्पर्धा त्रिमूर्ती विकास मंडळ, मुंबई संचलित त्रिमूर्ती माध्यमिक विद्यालय शिरवंडेच्या भव्य पटांगणावर उत्साहात सुरु झाल्या .अगदी ग्रामीण भागातील मालवणपासुन सुमारे ४०किलोमीटर अंतरावर असलेल्या या शाळेत या स्पर्धा असूनही तालुक्यातील २९ शाळांमधील ४००स्पर्धकांनी यात सहभाग घेतला.
स्पर्धेचे उद्घाटन क्रिडा प्रेमी, सामाजिक कार्यकर्ते राजू गांवकर व सामाजिक कार्यकर्ते दशरथ गांवकर यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शालेय समिती अध्यक्ष उत्तम गांवकर हे होते. यावेळी क्रिडा व शारीरिक शिक्षक संघाचे अध्यक्ष अजय शिंदे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. यावेळी
शालेय समिती अध्यक्ष उत्तम गांवकर, सदस्य दिपक चव्हाण, सामाजिक कार्यकर्ते राजू गांवकर दशरथ गांवकर , सरपंच शिरवंडे
सौ. चैताली घाडीगांवकर, , उपसरपंच शिरवंडे सुरेश गांवकर,
उपसरपंच असगणी देवेंद्र पुजारे,उपाध्यक्ष शिक्षक पालक संघ संजय घाडीगांवकर, उपाध्यक्ष, शाळा व्यवस्थापन समिती अजित घाडीगांवकर,अध्यक्ष रामगड संस्था
शामराव प्रभुदेसाई ,उपाध्यक्ष रामगड संस्था सुभाष तळवडेकर, लवूराज गांवकर, रघुनाथ गांवकर, वासुदेव कासले,रामगड हायस्कूल मुख्याध्यापक अंकुश वळंजू, असरोंडी हायस्कूलचे मुख्याध्यापक सुशांत पाटील, हिवाळे हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री. पवार, मालवण तालुका क्रीडा समिती प्रमुख अजय शिंदे, शिक्षकसेना अध्यक्ष कमलेश गोसावी, दिनेश सावंत,कृष्णा कासले,बाबा सावंत, प्रकाश कासले, संतोष भोगटे, सिद्धेश गांवकरशिक्षकेतर कर्मचारी संघटनेचे कार्याध्यक्ष श्री. प्रदीप सावंत, कास्टा्ईब संघटना जिल्हा अध्यक्ष संजय पेंडुरकर, मुख्याध्यापक वामन तर्फे, क्रीडा शिक्षक सुभाष सावंत, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी, आरोग्य सेविका, तालुक्यातील क्रीडा शिक्षक, मोठ्या संख्येने स्पर्धेक पालक उपस्थित होते. उद्घाटन कार्यक्रमाचे औचित्य साधून उपस्थित मान्यवरांसह तालुक्यातील उपस्थित सर्व क्रिडा शिक्षकांचा सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक वामन तर्फे यांनी केले. सुत्रसंचालन श्री. काणेकर सर यांनी केले. तर आभार क्रिडा शिक्षक सुभाष सावंत यांनी मानले. स्पर्धेचे औचित्य साधून आपली आई कै. सौ. सुलोचना गांवकर यांच्या स्मरणार्थ सर्व स्पर्धेकांच्या अल्पोपहाराची व सर्व शिक्षक, वाहन चालक व ग्रामस्थ यांच्या दोन दिवसांच्या जेवणाची व्यवस्था शिरवंडे गावचे सुपुत्र आणि शिवसेना वसई शहर प्रमुख शरद गांवकर यांनी केली. तर क्रिडा प्रेमी आणि सामाजिक कार्यकर्ते राजू गांवकर यांनी प्रशालेतील स्पर्धक विद्यार्थी आणि कर्मचारी यांच्यासाठी टी शर्ट दिले. स्पर्धा यशस्वी होण्यासाठी
आर्थिक व इतर सहकार्य करणाऱ्यांचे संस्था आणि शाळेच्या वतीने आभार व्यक्त केले.
