राष्ट्रवादीचा उद्या सावंतवाडीत पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा मेळावा…

माजी मंत्री श्री बाळासाहेब पाटील यांची उपस्थिती; सर्वांनी उपस्थित राहण्याचे अर्चना घारे यांचे आवाहन…

⚡सावंतवाडी ता.१२-: राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा मेळावा दिनांक १३ ऑक्टोबर २०२३ रोजी आयोजित करण्यात आला आहे. सावंतवाडी मधील रविंद्र मंगल कार्यालय येथे सकाळी ११ वाजता आयोजित या कार्यकर्ता मेळाव्याची तयारी आता अंतिम टप्प्यात असून, माजी मंत्री तथा आमदार श्री. बाळासाहेब पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणाऱ्या कार्यकर्ता मेळाव्यास जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष श्री. अमित सामंत व राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या कोकण विभागीय अध्यक्ष सौ. अर्चना घारे यांनी केले आहे.

You cannot copy content of this page