जुबीन नौटियाल यांच्या सावंतवाडीतील कार्यक्रमाची जय्यत तयारी…

भाजप नेते विशाल परब यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजन; नियोजनात कमतरता राहू नये यासाठी कार्यकर्त्यांकडून मेहनत..

⚡सावंतवाडी ता.१२-: येथील पालिकेच्या जिमखाना मैदानावर होणाऱ्या प्रसिद्धी गायक जुबिन नौटीयाल यांच्या कार्यक्रमाची विशाल परब मित्रमंडळ व भाजपच्या माध्यमातून जय्यत तयारी सुरू असून नियोजनात कुठल्याही प्रकारची कमतरता राहू नये यासाठी जोरदार मेहनत घेतली जात आहे.
भाजपा नेते तथा युवा उद्योजक विशाल परब यांचा 15 ऑक्टोंबर ला सोहळा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे यामध्ये 9 ऑक्टोंबर पासून 15 ऑक्टोंबर पर्यंत विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले असून 15 ऑक्टोबरला सावंतवाडीमध्ये प्रसिद्ध गायक जुबीन नौटीयाल यांच्या गांण्याचा लाईव्ह शो होणार आहे. तरुणासह युवाईला भुरळ घालणाऱ्या नौटीयाल यांच्या कार्यक्रमाला होणारी गर्दी लक्षात घेता. विशाल परब मित्रमंडळाकडून चोक नियोजन आखण्यात आले आहे.

शिवाय सावंतवाडी नगरपालिकेच्या जिमखाना मैदानावर प्रशस्त असे स्टेज उभारण्यात आले आहे कार्यक्रमाची तयारी युद्धपातळीवर सुरु असून संपूर्ण रबर बँण्ड मिळवण्यासाठी बुकिंग सेंटरवर मोठी गर्दी ही उसळत आहे.
दरम्यान या कार्यक्रमाच्या आधी विशाल परब यांचा वाढदिवस भाजप नेत्यांच्या उपस्थितीत साजरा होणार आहे. यासाठी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत त्यामुळे कार्यक्रमात कुठलीही कसर राहू नये यासाठी भाजपा पदाधिकारी तसेच विशाल परब मित्र मंडळ चे कार्यकर्ते जातीनिशी लक्ष ठेवून आहेत.
तर खुद्द विशाल परब यांनी सुद्धा कार्यक्रमाच्या नियोजनात लक्ष घातला असून या कार्यक्रमासाठी प्रतिष्ठित लोकांना आमंत्रण देण्यासाठी ते खुद्द जातीनशे तिथपर्यंत पोहोचत आहेत त्यामुळे विशाल परब त्यांच्या या कार्यक्रमाला तुफान गर्दी उसळेल यात शंकाच नाही.

You cannot copy content of this page