भाजप नेते विशाल परब याची ग्वाही; दोडामार्ग येथे न्यू होम मिनिस्टर कार्यक्रमाला उपस्थिती..
दोडामार्ग
जिल्ह्याच्या एका टोकाला असलेला दोडामार्ग तालुका विकासात्मकदृष्ठा काहीसा मागास राहिलेला आहे मात्र येणाऱ्या काळात या तालुक्याचा चेहरामोहरा बदलण्यासाठी माझे प्रामाणिक प्रयत्न राहणार आहे अशी ग्वाही भाजपा नेते युवा उद्योजक विशाल परब यांनी दोडामार्ग येथे दिली.
दोडामार्ग येथील न्यू होम मिनिस्टर कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर नगराध्यक्ष चेतन चव्हाण,उपनगराध्यक्ष देवीदास गवस, नगरसेवक नितीन मनेरकर, नगरसेवीका गौरी पार्सेकर,नगरसेवीका क्रांती जाधव , नगरसेवीका संजना म्हावळकर,नगरसेवक रामचंद्र मणेरीकर,जिल्हा बँक संचालक प्रकाश मोर्ये, सौ. वेदीका परब प्रभाकर परब,सौ.प्रमिला परब,विकास परब, माजी तालुकाध्यक्ष प्रविण गवस,सरपंच संघटना अध्यक्ष देवेंद्र शेटकर,माजी नगरसेवक समीर रेडकर ,
सामजिक कार्यकर्ते विवेकानंद नाईक,आदी उपस्थित होते.
