गोव्याहून मुंबईच्या दिशेने होणाऱ्या बेकायदा दारू वाहतुकीवर स्थानिक गुन्हे शाखेने रोखली…

८६ लाख ५८ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त;बेळगाव येथील एक ताब्यात..

⚡बांदा ता.११-: गोव्याहून मुंबईच्या दिशेने होणाऱ्या बेकायदा दारू वाहतुकीवर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मुंबई-गोवा महामार्गावर इन्सुली खामदेव नाका येथे सर्वात मोठी कारवाई केली. पथकाने कारवाई करत तब्बल ७१ लाख ५८ हजार रुपये किमतीच्या दारुसह एकूण ८६ लाख ५८ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी चालक ज्योतिबा परशुराम गावडे (वय ३०, रा. शिवाजीनगर, बेळगाव) याचेवर बांदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करत अटकेची कारवाई करण्यात आली.

ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संदीप भोसले, सहाय्यक पोलीस निरीक्षक महेंद्र घाग, पोलीस अंमलदार गुरुनाथ कोयंडे, प्रकाश कदम, अनुपकुमार खंडे, आशिष गंगावणे, किरण देसाई, आशिष जमादार, चंद्रकांत पालकर, चंद्रहास नार्वेकर, संतोष सावंत यांच्या पथकाने केली.

You cannot copy content of this page