मालवण ता.११-:
भंडारी एज्युकेशन सोसायटी मुंबई (मालवण) संचलित वडाचापाट येथील श्री देवी शांतादुर्गा हायस्कूल येथे सुरू असलेल्या आयबीटी या उपक्रमाला आयबीटीचे मुख्य प्रवर्तक असलेल्या ‘लँड ए हॅन्ड इंडिया’ या संस्थेने ए ग्रेड जाहीर केली आहे.
शांतादुर्गा हायस्कूल येथे आयबीटी अंतर्गत विविध उपक्रम राबविण्यात येतात. तसेच आयबीटी अंतर्गत हायस्कूलच्या परिसरात बांबू लागवड तसेच विविध भाज्यांची लागवड केली आहे. या उपक्रमांची दखल घेत शांतादुर्गा हायस्कुलच्या आयबीटी उपक्रमाला ए ग्रेड देण्यात आली आहे. हे यश मिळविण्यासाठी मेहनत घेणारे प्रशालेचे मुख्याध्यापक प्रसाद कुबल, शाळेतील आयबीटी निदेशक, शिक्षक व आयबीटी अंतर्गत शिक्षण घेणारे विद्यार्थी यांचे भंडारी एज्युकेशन सोसायटी मालवण मुंबई या संस्थेचे अध्यक्ष विजय पाटकर यांनी अभिनंदन केले आहे.
