⚡वेंगुर्ला ता.११-: गोवा बनावटीची दारु वाहतुक प्रकरणात वेंगुर्ला पोलिसांनी शिरोडा मिठागर मार्गावर रात्री मोठी कारवाई केली. दारू व मारुती कार सह सुमारे २ लाख १५ हजार ४४० रुपयांचा मुद्देमाल जप्त करून एकाला ताब्यात घेतले आहे.
रेडी ते वेंगुर्ला जाणा-या रस्त्यावर पेट्रोलिंग दरम्यान वेंगुर्ला पोलिसांनी शिरोडा मिठागर येथे भरधाव वेगात जाणारी मारुती सुझुकी अल्टो कार नंबर एम एच ०७-एएच-२२०७ या गाडीची थांबवून तपासणी केली असता गाडीमध्ये बेकायदा गोवा बनावटीची सुमारे सुमारे १ लाख ४५ हजार ४०० दारू आढळून आली. सायमन बसत्याव घोंसालविस, वय ५५ वर्षे, रा. होडावडा गोसावीवाडी, ता. वेंगुर्ला हा मारुती सुझुकी अल्टो कार मध्ये ही दारू घेऊन जात होता. त्याच्यासह सर्व मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला. आणि महाराष्ट्र दारूबंदी कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई पोलीस निरीक्षक अतुल जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस भिसे, योगेश राऊळ, अजित जाधव यांनी सापळा रचून केलेली आहे.
