पंचायत समिती इमारतीचा प्रस्ताव दोन कोटी असताना बारा कोटीची वाढ कशी काय झाली…?

परशुराम उपरकर; ठेकेदारांचा भलं करण्यासाठी केसरकारांची खेळी..

⚡सावंतवाडी ता.११-: पंचायत समिती इमारतीचा प्रस्ताव हा दोन कोटीचा असताना यात १२ कोटीची वाढ कशी काय झाली असा सवाल उपस्थित करत यात ठेकेदारांची भलं करण्यासाठी मंत्री केसरकारांनी या प्रस्तावात वाढ केला असल्याचा आरोप मनसेचे माजी आमदार परशुराम उपरकर यांनी आज येथे केला.दरम्यान मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचा प्रश्न हा देखील अद्याप कागदावरच आहे. त्याचं बजेट 30 कोटी असताना ते देखील आता 100 कोटीच्या बाहेर जाईल याला केसरकर जबाबदार राहील असा आरोप देखील उपरकर यांनी त् यावेळी केला. ते आज सावंतवाडी येथील आयोजित पत्रकार परिषदेत

यावेळी उपरकर पुढे बोलतात म्हणाले की केसरकर यांनी घोषणा केलेल्या चष्मा कारखाना ,रोपवे, मनोरेल, तिलारी पार्क काय झाले असा सवाल देखील उपरकर यांनी यावेळी उपस्थित केला.दरम्यान भाजप आणि शिवसेना सात वर्ष सत्तेत आहेत मात्र जिल्ह्यात कुठलेही विकास कामे आणले नाहीत. उलट त्यांच्यात आता श्रेय वादासाठी दोघांच्या भांडण सुरू आहेत असा आरोप देखील उपरकर यांनीयावेळी केला.

माजी शहराध्यक्ष तथा मनविसे जिल्हाध्यक्ष आशिष सुभेदार, मनसे रस्ते सुविधा आस्थापना जिल्हासंघटक अभय देसाई मनविसे जिल्हा सचिव निलेश देसाई माजी तालुका सचिव राजेश संसारी टंगसाळी विद्यार्थीसेना तालुकाध्यक्ष संदेश सावंत उपस्थित होते.

You cannot copy content of this page