मनसेचे परशुराम उपरकर यांची टीका:तर पालकमंत्री स्वतःचे प्रकल्प व जमीन वाढविण्यात व्यस्त
सावंतवाडी ता.१०-: मतदारसंघातील मागील अनेक वर्षाचे प्रलंबित अनेक विकासाचे प्रश्न असताना देखील मंत्री केसरकर आता निवडणूक डोळ्यासमोर ठेवून मोठ्या मोठ्या प्रकल्पाच्या घोषणा करीत एक प्रकारे मतदारसंघातील नागरिकांना उल्लू बनविण्याचे काम सुरू केले असल्याचा आरोप माजी आमदार परशुराम उपरकर यांनी आज येथे केला.
दरम्यान जिल्ह्यात रस्त्यांची दुरवस्था झाली असताना जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण हे फक्त स्वतःचे प्रकल्प व स्वतःच्या जमीनी घेण्यात व्यस्त असल्याचा आरोप देखील उपरकर यांनी यावेळी केला. ते सावंतवाडीत आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.
यावेळी माजी शहराध्यक्ष तथा मनविसे जिल्हाध्यक्ष आशिष सुभेदार, मनसे रस्ते साधन सुविधा व आस्थापना अभय देसाई, मनविसे जिल्हा सचिव निलेश देसाई, स्वप्नील जाधव, विजय जांभळे, सुनील नाईक, संदेश सावंत, रमेश शेळके, अभिषेक पेडणेकर, प्रणित टाळकर, विशाल गांवकर नितीन गावकर, ओंकार गांवकर अतुल गांवकर ज्ञानेश्वर नाईक आदी उपस्थित.
यावेळी उपरकर पुढे बोलतात म्हणाले की मंत्री दीपक केसरकर जिल्ह्याचे पाच वर्षे पालकमंत्री असताना मतदारसंघातील विकास करू शकले नाहीत. मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल सारखं प्रश्नावर देखील राजकार करतात. तसेच टर्मिनल्स वर देखील राजकारण केसरकर यांनी केले. त्यामुळे केसरकर हे फक्त राजकारण करून कुठेतरी लोकांना मी काम करत असल्याचा प्रयत्न दाखवित असल्याचा आरोप मनसेचे माजी आमदार परशुराम उपरकर यांनी मंत्री केसरकर यांच्यावर आज येथे केला. दरम्यान प्रत्यक्ष जिल्ह्याच्या तिजोरीच्या चाव्या तुमच्या हातात असताना देखील तुमच्या मतदारसंघातील तुम्ही विकास करू शकला नाहीत. तसेच तुम्ही राज्याचे शिक्षणमंत्री असताना देखील जिल्ह्यातील तरुणांना नोकऱ्या मिळू शकल्या नाहीत, तर काय करायचे आहे ते मंत्रीपद आणि काय करायचे ते आमदार ? असा टोला देखील त्यांनी यावेळी केसरकर यांना लागावला.
