निवडणूक डोळ्यासमोर ठेवून मंत्री केसरकर जनतेला उल्लू बनवितात…

मनसेच्या परशुराम उपरकर यांची टीका:तर पालकमंत्री स्वतःचे प्रकल्प व जमीन वाढविण्यात व्यस्त

सावंतवाडी ता.१०-: मतदारसंघातील मागील अनेक वर्षाचे प्रलंबित अनेक विकासाचे प्रश्न असताना देखील मंत्री केसरकर आता निवडणूक डोळ्यासमोर ठेवून मोठ्या मोठ्या प्रकल्पाच्या घोषणा करीत एक प्रकारे मतदारसंघातील नागरिकांना उल्लू बनविण्याचे काम सुरू केले असल्याचा आरोप माजी आमदार परशुराम उपरकर यांनी आज येथे केला.

दरम्यान रस्त्यांची दुरवस्था झाली असताना जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण हे फक्त स्वतःचे प्रकल्प व स्वतःच्या जमीनी घेण्यात व्यस्त असल्याचा आरोप देखील उपरकर यांनी यावेळी केला. ते सावंतवाडीत आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.

यावेळी माजी शहराध्यक्ष तथा मनविसे जिल्हाध्यक्ष आशिष सुभेदार, मनसे रस्ते साधन सुविधा व आस्थापना अभय देसाई, मनविसे जिल्हा सचिव निलेश देसाई, स्वप्नील जाधव, विजय जांभळे, सुनील नाईक, संदेश सावंत, रमेश शेळके, अभिषेक पेडणेकर, प्रणित टाळकर, विशाल गांवकर नितीन गावकर, ओंकार गांवकर अतुल गांवकर ज्ञानेश्वर नाईक आदी उपस्थित.

You cannot copy content of this page