आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्रे;..
⚡बांदा ता.१०-: शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) अल्पसंख्यांक सेलच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांची आज निवड करण्यात आली. ज्येष्ठ नेते तथा आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते नूतन पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्रे देण्यात आली.
अल्पसंख्यांकच्या सावंतवाडी उपतालुका प्रमुख पदी अकमारुरझा अब्बास अली खान यांची, सावंतवाडी महिला उपतालुका प्रमुखपदी बिस्मिल्ला रियाज खान यांची, तालुका सचिवपदी मुख्तार गफुर शेख यांची तर कुडाळ महिला तालुका प्रमुखपदी रिझवाना नईम शेख यांची निवड करण्यात आली. कुडाळ येथे कार्यक्रमात सर्व पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली.
यावेळी आमदार वैभव नाईक, अल्पसंख्यांक जिल्हाध्यक्ष मस्जिद बटवाले, जिल्हाप्रमुख संजय पडते, मंदार शिरसाट, अल्पसंख्यांक जिल्हा उपाध्यक्ष रियाज खान, आबा सावंत, शब्बीर मणियार, निसार शेख, जावेद शाह, रफिक बेग आदी उपस्थित होते. आगामी निवडणुका लक्षात घेता पक्ष संघटना वाढीसाठी तळागाळात जाऊन काम करण्याचे आवाहन यावेळी आमदार नाईक यांनी केले.
