पोलिस निरीक्षक अरुण पवार यांचे पदाधिकाऱ्यांना आवाहन
⚡दोडामार्ग,ता.०५-: तालुक्यातील नवरात्रोत्सव मंडळांनी धार्मिक कार्यक्रमांसोबत सामाजिक उपक्रमही राबवावेत आणि नवरात्रोत्सव शांततेत साजरा करावा,असे आवाहन येथील पोलिस निरीक्षक अरुण पवार यांनी केले.तालुक्यातील नवरात्रोत्सव मंडळांच्या पदाधिकाऱ्यांची त्यांनी पोलिस ठाण्यात बैठक घेतली.त्यावेळी त्यांनी आवाहन केले. गणेशोत्सवात बाजारपेठेतील वाहतुकीचे योग्य नियोजन केल्याबद्दल श्री. पवार यांचे येथील गणेशोत्सव मंडळातर्फे अध्यक्ष अजित चांदेलकर, सचिव नितीन मणेरीकर यांच्याकडून अभिनंदन करण्यात आले.
श्री.पवार म्हणाले,नवरात्रोत्सव मंडळांनी लाऊडस्पिकर व अन्य सर्व परवानग्या ऑनलाईन प्रक्रियेद्वारे पूर्ण करून प्रशासनाला सहकार्य करावे.श्री दुर्गेची प्रतिष्ठापना केलेल्या ठिकाणी स्वच्छता राखावी. स्वयंसेवक नेमावे. महाप्रसादावेळी योग्य ती काळजी घ्यावी अशा सूचना केल्या.
