मतदारसंघातील विकास काम होत नसेल तर आम्ही उद्धव ठाकरेंसोबत का राहायचं…

मंत्री दीपक केसरकर: कोणीतरी दुखावलं म्हणून किरण सामंत यांनी डीपी बदलला असेल, लोकसभेला पक्षा देखील त्या उमेदवाराचा प्रचार करणार..

सावंतवाडी ता.०९-: उद्धव ठाकरे यांनी अडीच वर्षात मुख्यमंत्री च्या काळात आंबोली कबुलायतदार गावकर प्रश्नावर एकही मीटिंग घेतली नाही साधा “स्टे”देखील ते उठू शकले नाहीत जर मतदारसंघातील कामच होत नसतील तर आम्ही त्यांच्यासोबत का राहायचं असा सवाल करत मंत्री दीपक केसरकर यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टिका केली.दरम्यान कोणी तरी दुखावलं असेल त्यामुळे किरण सामंतांनी आपल्या व्हॉटसअ‍ॅपचा डिपी बदलला. काही वेळा राजकारणात अशा गंमती करायच्या असतात तसे केल्यामुळे उलट त्यांना फोन आले. मात्र काही झाले तरी लोकसभा निवडणूकीत पक्ष देईल त्या उमदेवाराचा आम्ही प्रचार करणार आहोत, अशी भूमिका शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी आज येथे मांडली.

यावेळी केसरकर पुढे बोलताना म्हणाले की उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात 50 50 गावातील लोक पाण्यासाठी तळमळत होते ते देखील प्रश्न उद्धव ठाकरे सोडू शकले नाहीत तर आम्ही न्याय कोणाकडे मागायचा तसेच आंबोली कबुलायतदार गावकर जमीन देखील ते शेतकऱ्यांच्या नावावर करू शकले नाहीत त्यांना मी वारंवार सांगून निखिल त्यांनी दुर्लक्ष केले कारण त्यांना शेतकऱ्यांची तळमळ नसून फक्त राजकारण करण्याची तळमळ असल्याची टीका देखील श्री.केसरकर यांनी यावेळी केली. चांद ते बांदा योजनेतून गरीब मच्छीमारांना इंजिन मिळतात मात्र ती देखील योजना उद्धव ठाकरे यांच्या काळात अजित पवार यांनी रद्द करून टाकली होती तरी देखील उद्धव ठाकरे एक शब्द देखील बोलले नाहीत तेच अजित पवार आज आमच्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आहेत त्यांना मुख्यमंत्र्यांनी एक सूचना केल्याबरोबर त्यांनी ताबडतोब त्या योजनेला मंजूरी दिले त्यामुळे तुम्ही जरी एक शब्द त्या काळात अजित पवारांकडे टाकला असता असता तरी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील लोकांना शंभर कोटी रुपये मिळाले असते परंतु उद्धव ठाकरे यांची क्षमताच नाही त्यामुळे लोकांना राजकारण नको असून विकास कामे पाहिजे आहेत असं टोला देखील श्री. केसरकर यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला.

You cannot copy content of this page