चांदा ते बांदा योजनेचे अखर्चित ६४ कोटी खर्च करण्यास अर्थमंत्र्यांची परवानगी…

मंत्री दीपक केसरकर यांची माहीती ; अजित पवार यांचे मानले आभार..

⚡सावंतवाडी ता.०९-: चांदा ते बांदा योजनेचे 64 कोटी अखर्चित होते ते अजित पवार यांनी खर्च करण्यासाठी परवानगी दिली आहे. त्यामुळे मी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे मी आभार मानतो अशी माहिती राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी आज येथे दिले. दरम्यान रत्न सिंधूच बजेट हे 25 कोटी वरून 100 कोटी रुपये करायला देखील मंजुरी दिले. त्यामुळे येणारा काळात सिंधुदुर्ग किल्ल्याचा विकास आता झपाट्याने होऊन चांगले दिवस येतील असा विश्वास देखील श्री.केसरकर यांनी यावेळी व्यक्त केला. ते सावंतवाडीत आपल्या निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.

यावेळी श्री. केसरकर पुढे बोलताना म्हणाले की जिल्ह्यात शिरोडा येथील ताज सारखा एवढा मोठा प्रश्न मी 25 वर्षानंतर सोडून दाखवला काही लोक त्यात राजकारण देखील करत होते परंतु राजन तेली त्यांच्याबरोबर माझे चांगले संबंध असल्याने मी त्यांना विनंती केल्यानंतर त्यांनी देखील सहकार्य करण्याचे ग्वाही मला दिली. त्यामुळे लवकरच तो प्रश्न देखील मार्गी लागेल असे ही केसरकर यावेळी बोलताना म्हणाले. दरम्यान विकासाची आड राजकारण कोणी करू नये एखादे फाईव्ह स्टार हॉटेल उभारले तर 500 लोकांना यात रोजगार मिळू शकतो तसेच या मुलांना देखील ताबडतोब ट्रेनिंग देखील देण्याचे ताज सेंटर कडून सांगण्यात आले त्यामुळे पुढच्या दौऱ्यामध्ये मी ज्यांची जमीन गेली त्या घरातील रेशन कार्ड मधील एका व्यक्तीला त्या ठिकाणी नोकरीत समावेश करून घेण्यात येईल असे श्री केसरकर यावेळी म्हणाले.

You cannot copy content of this page