फडणवीस यांनी काय काम करावे हे सांगण्या इतके तुम्ही मोठे नाही…

आम. नितेश राणे यांचा शिवसेना आमदारांना सबुरीचा सल्ला

⚡कणकवली ता.०९-:
तुम्ही मुख्यमंत्री शिंदे यांना किती त्रास देता हे पहा. फडणवीस यांनी काय काम करावे? कुठे करावे? हे सांगण्या इतके तुम्ही मोठे नाही.या तिघांना काम करू द्या.तुमच्या बोलण्याचा राऊत,ठाकरे यांना फायदा होईल असे वागू नका असे आवाहन आम.नितेश राणे यांनी मित्र पक्ष असलेल्या शिवसेना आमदारांना केले.मुंबई महानगरपालिका निवडणुक ठाकरे सेनेमुळे लांबत आहे. ठाकरे सेनेने न्यायालयात टाकलेल्या याचिका मागे घ्या मग निवडणूक आयोग निवडणुका घेईल.असे आम.नितेश राणे म्हणाले.

ग्रामसेवक बनायची लायकी नसलेला संजय राऊत 2019 ला मुख्यमंत्री पदाचे स्वप्न बघत होते.शरद पवार आपलेच नाव चालवणार म्हणून आमदारांना फोन करायला लागला पण 2 ते 3 पेक्षा जास्त आमदार याच्या बैठकीला जमलेच नाहीत .उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना तुमची लायकी ओळखली म्हणूनच संजय राऊत यांचा भाऊ सुनील राऊत यांना साधं राज्यमंत्री केलं नाही.त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल बोलण्याआधी संजय राऊत यांनी स्वतःची लायकी पाहावी अशी जळजळीत टीका भाजप प्रवक्ते,आमदार नितेश राणे यांनी केली.
दरम्यान मनोज जरंगे पाटील यानी समाजाने काम करावे.उबाठाचे स्वतःचे चिन्ह नाही पक्ष नाही, मग काय करणार ?त्यांना इंडिया आघाडी शिवाय पर्याय नाही. राऊत यांची स्क्रिप्ट कुठून येते ?मातोश्री,सिलवर ओक की पवार साहेबांकडून येते हे आधी सांगा. नंतर दुसऱ्यावर टीका करा असेही आम.नितेश राणे यांनी सुनावले.

You cannot copy content of this page