चंदगड येथील आरोग्य विभागामध्ये असणारे संग्राम अशोक पाटील यांचा अनोख्या पद्धतीने वाढदिवस

⚡चंदगड ता.०१-: प्रत्येकजण आपला जन्मदिवस अनोख्या पद्धतीने साजरा करत असतो त्यातच मूळचे गारगोटी जिल्हा कोल्हापूर येथील व सध्या चंदगड जिल्हा कोल्हापूर येथे आरोग्य विभागामध्ये असणारे संग्राम पाटील यांनी वाढदिवसाचे औचित्य साधून एक नवीन उपक्रम राबविला आहे यामध्ये उपचारात्मक उद्देशाने मारणोत्तर शरीरातील नमूद केलेले अवयव आणि पेशी यांचे दान करण्याचे त्यांनी ठरवले आहे व त्याप्रमाणे अधिकृत त्यांनी सर्व प्रक्रिया करून ठेवली .

अवयव दान श्रेष्ठ दान असे मनात ठेवून त्यांनी युवा वर्गा समोर एक वेगळा आदर्श ठेवला आहे
वाढदिवस म्हटले कि पार्टी व इतर गोष्टी आल्या त्याच सोबत आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो असे जाणून त्यांनी हा निर्णय घेतला व इतरांनाही याचे महत्व त्यांनी पटवून देऊन अश्याप्रकारे अवयव दान करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.

You cannot copy content of this page