जिल्हास्तरीय ऍथलेटिक्स स्पर्धेत भालाफेकमध्ये लवु नाईक द्वितीय…

थ्रो-बॉल स्पर्धेत मडुरा हायस्कुलची सुवर्ण कामगिरी

⚡बांदा ता.०१-: तुळसुली येथे संपन्न झालेल्या जिल्हास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धेत थ्रो-बॉल क्रीडा प्रकारात १४ वर्षांखालील वयोगटात मडुरा हायस्कूलने सुवर्ण कामगिरी करताना मुलगे व मुलींचे संघ अजिंक्य ठरले. तसेच १७ वर्षे वयोगटातील मुलींच्या संघाला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.


तसेच बांदा येथे झालेल्या जिल्हास्तरीय ऍथलेटिक्स स्पर्धेत १७ वर्षे वयोगटाखालील भालाफेक क्रीडा प्रकारात प्रशालेचा लवू (बंटी) प्रशांत नाईक याने द्वितीय क्रमांक पटकावला. थ्रो बॉल स्पर्धेतील दोन्ही विजयी संघ हातकणंगले कोल्हापूर येथे होणाऱ्या शालेय विभागीय स्पर्धेसाठी पात्र ठरले आहेत.
विद्यार्थ्यांना क्रीडा शिक्षक महेश नाईक यांचे मार्गदर्शन लाभले. विजयी संघांचे धी बांदा नवभारत शिक्षण प्रसारक मंडळ मुंबईचे कार्याध्यक्ष डॉ. मिलिंद तोरसकर, संस्थेचे सर्व पदाधिकारी, शालेय समिती सदस्य, पंचक्रोशीतील सरपंच, प्रशालेचे मुख्याध्यापक सुहास वराडकर, सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी यांच्याकडून अभिनंदन करण्यात आले. विजयी खेळाडूंचे पंचक्रोशीतून कौतुक होत आहे.

You cannot copy content of this page