नट वाचनालय, बांदा संस्थेच्या वतीने ‘आंतरराष्ट्रीय माहिती अधिकार दिन साजरा…

⚡बांदा ता.०१-: नट वाचनालय, बांदा या संस्थेच्या वतीने ‘आंतरराष्ट्रीय माहिती अधिकार दिन साजरा करण्यात आला. यावेळी ग्रंथालय शास्त्राचे जनक डॉ. एस. आर. रंगनाथन यांच्या प्रतिमेचे पूजन करून माहितीचा अधिकार व कायदेविषयक पुस्तकांचे प्रदर्शन मांडण्यात आले.
या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे अँड संदीप दिगंबर चांदकर हे होते. त्यांच्या हस्ते व अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत डॉ. एस. आर. रंगनाथन यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून समई प्रज्वलित करून ग्रंथप्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी आपल्या भाषणात सार्वजनिक ग्रंथालय व माहितीचा अधिकार याविषयी माहिती सांगितली.
ग्रंथालय व माहितीचा अधिकार यातील दुबे व माहितीच्या अधिकाराचे महत्व सांगितले. यावेळी वाचनालयाचे उपाध्यक्ष निलेश मोरजकर, सचिव राकेश केसरकर, संचालक जगन्नाथ सातोसकर, सौ. स्वप्निता सावंत, अनंत भाटे, अंकुश माजगावकर, ग्रंथपाल प्रमिला नाईक-मोरजकर, लिपिक सुनील नातू, अमिता परब आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page