ज्येष्ठ नागरिक सेवा संघातर्फे ज्येष्ठांच्या सत्काराचे आयोजन

⚡कणकवली ता.३०-: जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनाचे औचित्य साधून सिंधुदुर्ग जिल्हा ज्येष्ठ नागरिक सेवा संघातर्फे ६० वर्षावरील ज्येष्ठांच्या गौरव समारंभाचे आयोजन रविवार, १ ऑक्टोबरला येथील एचपीसीएल हॉल येथे सकाळी १० वा. करण्यात आले आहे.


डॉ. विद्याधर तायशेटे यांच्यातर्फे एसटी बसस्थानकासाठी व्हीलचेअर देण्यात आली असून त्याचेही लोकार्पण यावेळी होणार आहे. यावेळी तहसीलदार दीक्षांत देशपांडे, रोटरी क्लबचे अध्यक्ष रवि परब, पोलीस निरीक्षक अमित यादव आदी उपस्थित राहणार आहेत. ज्येष्ठ नागरिक, सेवाभावी संस्थांचे प्रतिनिधी यांनी उपस्थित रहावे, असे आवाहन ज्येष्ठ नागरिक सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष भालचंद्र मराठे, कणकवली तालुकाध्यक्ष मनोहर पालयेकर यांनी केले आहे.

You cannot copy content of this page