वैश्यवाडा येथून दुचाकी चोरीस…

अज्ञाता विरोधात गुन्हा दाखल

*💫सावंतवाडी दि.०८-:* सावंतवाडी वैश्यवाडा येथील गणेश बिले यांची बिल्डिंग खाली लावलेली दुचाकी अज्ञात व्यक्तीने चोरून नेली असून, ही बाब आज उघडकीस आली आहे. शनिवारी त्यानी आपली दुचाकी बिल्डिंग खाली लावली होती. परंतु आज त्यानी बिल्डिंग पाहिले असता दुचाकी दिसून आली नाही. त्यामुळे गाडी मालकांनी पोलिस स्थानकात धाव घेत अज्ञात व्यक्ती विरोधात तक्रार दाखल केली असून, पोलिसांनी अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

You cannot copy content of this page