मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या नाणार भूमिकेचे बबन साळगावकर यांच्या कडून स्वागत

सावंतवाडी : माजी नगराध्यक्ष तथा राष्ट्रवादी नेते बबन साळगावकर यांनी नाणार ग्रीन रिफायनरी राजापूर रत्नागिरी प्रश्नी राज ठाकरे यांनी घेतलेल्या भूमिकेचे स्वागत केले आहे. सर्वप्रथम सिंधुदुर्ग जिल्हयातुन ग्रीन रिफायनरीचे समर्थन आपण केले होते. त्यानंतर माजी आमदार प्रमोद जठार यांनी पण समर्थन केले. त्यावेळी जिल्ह्यातून मोठ्या रोषास आम्हाला सामोरं जावं लागलं होतं. सिंधुदुर्ग जिल्हा तसेच महाराष्ट्रातील बेरोजगार तरुणांची संख्या वाढत असताना सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यामधील तरुणाला नोकरीच्या निमित्तानं गाव सोडून मुंबई पुन्हा औरंगाबाद तसेच हैदराबाद गोवा या सारख्या मोठ्या शहरांमध्ये जावे लागते. तसेच काही तरूण परप्रांतामध्ये नोकरीच्या निमित्ताने गेले. त्या तरुणांच्या आई-वडिलांना एकटेपणाची जीवन जगावे लागत आहे अशी भूमिका मांडून ग्रीन रिफायनरीचे समर्थन केले होते. परंतु आज त्या काळामध्ये ही समर्थन केल्यानंतर पोटाच्या बेंबी पासून ओरडून विरोध करणारे स्वाभिमानी आता ग्रीन रिफायनरी चे समर्थन करत आहेत. दूरदृष्टी ठेवून त्याच वेळी ग्रीन रिफायनरी ला समर्थन दिले असते तर ग्रीन रिफायनरी 20 टक्के काम पूर्ण होऊ शकले असते. स्वाभिमानी आज समर्थन करतातच आहेत तसेच राज ठाकरे यांनी घेतलेल्या भूमिकेचा आम्ही स्वागत करतो. राज ठाकरे यांच्या भूमिकेचे स्वागत करून सरकारने सकारात्मक पावले उचलून ग्रीन रिफायनरी रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या बाहेर जाणार नाही याची दक्षता घ्यावी असं मत बबन साळगावकर यांनी व्यक्त केले.

You cannot copy content of this page