*💫सिंधुदुर्गनगरी दि.०८-:* जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत आज जिल्ह्याच्या प्रमुख महिला जिल्हाधिकारी यांचा सन्मान मनसे सरचिटणीस परशुराम उपरकर यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन करण्यात आला आहे. यावेळी जिल्हाधिकारी के. मंजू लक्ष्मी , निवासी जिल्हाधिकारी शुभांगी साठे यांचा सन्मान करण्यात आला आहे. यावेळी मनसे पदाधिकारी विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष कुणाल किनळेकर, उपजिल्हाध्यक्ष दया मेस्त्री, कुडाळ तालुकाध्यक्ष प्रसाद गावडे, अनाव सरपंच आप्पा मांजरेकर , संतोष सावंत आदी पदाधिकारी उपस्थित होते.
मनसे कडून जागतिक महिला दिनानिमित्त जिल्ह्यातील प्रमुख महिलांचा सन्मान
