*💫सावंतवाडी दि.०८-:* सिंधुदुर्ग पोलीस दलातील सेवानिवृत पोलीस हवालदार प्रकाश शंकर रासम (५९, रा. हरकुळ खुर्द, कणकवली ) यांचे दिर्घ आजाराने आज निधन झाले आहे. सिंधुदुर्ग ओरोस पोलिस ठाण्यात कार्यरत असताना गेल्या वर्षी नोव्हेंबर २०२० मध्ये ते सेवानिवृत्त झाले होते. सावंतवाडीत आपल्या मुलीकडे ते राहायला होते. त्यांच्यावर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र, सोमवारी उपचारा दरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मूलगे, मूलगी असा परिवार आहे. सावंतवाडी पोलिस ठाण्यातील महिला पोलिस कर्मचारी प्रणाली रासम व भारतीय सैन्य दलातील जवान प्रथमेश रासम यांचे ते वडिल होत.
*सेवानिवृत्त पोलिस हवालदार प्रकाश रासम यांचे प्रदीर्घ आजाराने निधन*
