⚡वेंगुर्ला ता.१४-: मोटर व्हेईकल अँक्टचे उल्लंघन करणा-या 32 जणांवर पोलीसांकडून कारवाई करत न्यायालयात पाठविण्यात आलेल्या संबधितांवर दंडात्मक कारवाई करून दंड जमा करण्यात आला आहे.
वेंगुर्ला तालुक्यात वाहातुक नियमांचे उल्लंघन करणा-यांवर वेंगुर्ला पोलीस निरीक्षक अतुल जाधव यांचे मार्गदर्शनाखाली ट्रॅफिक पोलीस मनोज परूळेकर व गौरव परब यांनी कारवाई केली. या कारवाईत रहदारीला अडथळा केल्याप्रकरणी भारतीय दंड संहिता कलम 283 नुसार टेम्पो, रिक्षा व मोटर सायकल अशा 14 वाहनांवर, रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून वाहन वाहतुक करणा-या कलम 279 नुसार टेम्पो, डंपर व मोटर सायकल अशा 3 जणांवर, मोटर अधिनियम 185 चे उल्लंघन म्हणजे दारू पिऊन दारूच्या अंमलखाली वाहन चालविणा-या 12 मोटर सायकलवर, मोटर वाहन कायदा 184 प्रमाणे आपल्या ताब्यातील वाहन बेदरकारपणे चालविणारा 1 टेम्पो तर नशेत वाहन चालविणा-या दोघांवर उपविधी 84 अन्वये दारूच्या नशेत आढळलेले दोघांवर वाहातुक पोलीसांनी कारवाई करीत ही प्रकरणे न्यायालयात पाठविली होती.
या सर्व प्रकरणांत वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन प्रकरणी सर्वांवर न्यायालयाकडून दंडात्मक कारवाई करण्यात आली असून दंड रक्कम भरून घेण्यात आली आहे. वाहनधारक चालकांनी वाहतुक नियमांचे पालन करावे. तसेच वेंगुर्ला शहरात नगरपरीषद व पोलिसांकडून पार्किंगसाठी केलेल्या जागांच्या ठिकाणी वाहने करावीत. वहातुकीस अडथळा निर्माण होईल अशा ठिकाणी किंवा रस्त्याच्याकडेला वाहने उभी करु नयेत. त्यासाठी सर्व प्रकारच्या वाहनधारकांनी सहकार्य करावे असे आवाहन पोलीस निरीक्षक अतुल जाधव यांनी केले आहे.
