कणकवली न.पं.च्या वतीने शहर स्वच्छतेसाठी जनजागृती रॅली

⚡कणकवली ता.१४-:
स्वच्छता लीग २ अंतर्गत कणकवली नगरपंचायतीतर्फे पटकीदेवी ते आप्पासाहेब पटवर्धन चौकापर्यंत स्वच्छता रॅली काढण्यात आली. रॅलीतून स्वच्छतेचा संदेश देण्यात आला.
रॅलीत नगरपंचायतीचे प्रशासक तथा प्रांतधिकारी जगदिश कातकर, मुख्याधिकारी परितोष कंकाळ, स्वच्छ सर्वेक्षणचे ब्रँड ॲम्बेसेडर दीपक बेलवलकर, कणकवली नाईट राईडचे कर्णधार अमोल भोगले, रोटरीचे अध्यक्ष रवी परब, रोटरीय नितीन बांदेकर, महेंद्र मुरकर, कणकवली कॉलेज एनससीचे प्रमुख प्रा. राठोड, न. पं. चे कर्मचारी किशोर धुमाळे, सोनाली खेरे, मनोज धुमाळे, विनोद सावंत, ध्वजा उचले, विभव करंदीकर, प्रियांका सोनसुरकर, सतीश कांबळे, वर्षा कांबळे, संदीप मुसळे, रुचिता ताम्हाणेकर, प्रवीण गायकवाड, निकिता पाटकर, सचिन नेरकर, प्रशांत राणे, माधुरी डगरे यांच्यासह नगर पंचायत कर्मचारी, महिला बचत गटांचे सदस्य, कणकवली कॉलेज, विद्यामंदिर हायस्कूल, प. पू. भालचंद्र महाराज विद्यालय शाळा क्र. ३ चे विद्यार्थ्यासह रोटरीचे सदस्य व नागरिक सहभागी झाले होते. रॅलीदरम्यान प. पू. भालचंद्र महाराज विद्यालय शाळा क्र. ३ च्या विद्यार्थ्यांनी आप्पासाहेब पटवर्धन चौकात स्वच्छता विषयावर पथनाट्य सादर केले. त्यानंतर बुद्धविहार परिसरात सर्वांनी स्वच्छता मोहीम राबवून परिसर स्वच्छ केला. यावेळी
स्वच्छता आणि माझी वसुंधरा याविषयी शपथ घेण्यात आली.

You cannot copy content of this page