⚡वेंगुर्ला ता.१४-: वेंगुर्ला पाटकर हायस्कूल येथे तृणधान्यावर आधारित पार पडलेल्या तालुकास्तरीय पाककला स्पर्धेत दर्शना निलेश नानचे (परुळे) यांनी बनविलेल्या ‘ज्वारीचे आप्पे‘ या पाककृतीला प्रथम, प्राची प्रविण मेस्त्री (आरवली) यांनी बनविलेल्या ‘भरडधान्य थाळी‘ याला द्वितीय तर डॉ.सई संजिव लिगवत (वेंगुर्ला) यांनी बनविलेल्या ‘तृणधान्य कबाब‘ या पाककृतीला तृतीय क्रमांक मिळाला. स्पर्धेचे परीक्षण मॅक्स फुड लॅब वेंगुर्ल्याचे संचालक गजानन पारकर, आरोग्य विभागाच्या सुप्रिया रावळ व वेंगुर्ला कृषी विभागाच्या प्रभाग समन्वयक रेखा परूळेकर यांनी केले.
विजेत्यांना प्रमाणपत्र वितरप्रसंगी गटशिक्षणाधिकारी संतोष गोसावी, शिक्षणविस्तार अधिकारी भाकरे, वेंगुर्ला केंद्रप्रमुख आव्हाड, वेतोरे केंद्रप्रमुख नितीन कदम, मातोंड केंद्रप्रमुख लवू चव्हाण, पाल केंद्रप्रमुख कावळे, उभादांडा केंद्रप्रमुख अडुळकर, विषयतज्ज्ञ सावंत, डाटा ऑपरेटर तांडेल, प्रा.महेश बोवलेकर, मुख्याध्यापक आत्माराम सोकटे आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन पाटकर हायस्कूलच्या सहशिक्षिका मनिषा खरात यांनी केले.
