प्राथमिक शिक्षक समितीतर्फे गुणवंत पाल्यांचा गौरव

⚡मालवण ता.०८-: राज्य प्राथमिक शिक्षक समिती मालवण तालुका शाखेचा सभासद पाल्य गुणगौरव कार्यक्रम नुकताच कट्टा नं. १ शाळेत समितीचे तालुका अध्यक्ष राजेंद्रप्रसाद गाड यांच्या अध्यक्षतेखाली व जिल्हा सचिव सचिन मदने यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. यावेळी दहावी, बारावी उत्तीर्ण, पाचवी, आठवीतील शिष्यवृत्तीधारक, नवोदय विद्यालय निवड झालेल्या समिती सभासदांच्या पाल्यांचा भेटवस्तू व गौरवपत्र देऊन सन्मान करण्यात आला.

यावेळी माजी अध्यक्ष सुयोग धामापूरकर, सचिव जीवन हजारे, महिला आघाडी अध्यक्षा नेहा तांबे, संचालक मंगेश कांबळी, मार्गदर्शक श्रीकृष्ण सावंत, रुपेश गरुड, श्रीमती कराळे, भाग्यश्री वाडकर आदी उपस्थित होते. दिनेश ठाकुर यांनी मनोगत व्यक्त केले. बाळकृष्ण नांदोस्कर यांनी सूत्रसंचालन केले. प्रास्ताविक जीवन हजारे यांनी केले. आभार नवनाथ भोळे यांनी मानले.

You cannot copy content of this page