⚡सिंधुदुर्गनगरी ता.०८-: स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांकरिता तयार करण्यात आलेल्या ई-ग्रंथालय आणि स्पर्धा परीक्षा विभागाचे पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते रविवार दि. 10 सप्टेंबर रोजी सकाळी 10 वाजता लोकार्पण होणार आहे. हा सोहळा कुडाळ येथील रा.ब. अनंत शिवाजी देसाई (टोपीवाले) वाचनालय आणि ग्रंथ संग्रहालय पानबाजार येथे होणार आहे तरी नागरिकांनी या सोहळ्यास उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हा ग्रंथालय अधिकारी सचिन हजारे यांनी केले आहे.
पालकमंत्र्यांच्या हस्ते ई-ग्रंथालय आणि स्पर्धा परीक्षा विभागाचे लोकार्पण…
