आरोग्य शिबीराचे आयोजन ; तब्बल पन्नास ग्रामस्थांनी घेतला लाभ, ग्रामस्थांतून समाधान..
⚡सावंतवाडी ता.०८-: गणेशोत्सव काळात आरोग्याची काळजी म्हणून मळगाव ग्रामपंचायतच्या माध्यमातून ग्रामस्थांसाठी खास आरोग्य शिबिराचे आयोजन केले होते. ग्रामपंचायत कार्यालयात घेण्यात आलेल्या या शिबीराचा तब्बल 50 ग्रामस्थांनी लाभ घेतला.
जिल्ह्यासह सावंतवाडी तालुक्यात सद्या सर्दी ताप खोकला असे साथ रोग पसरले आहे. याच पार्श्वभूमीवर मळगाव ग्रामपंचायतच्या माध्यमातून गावातील ग्रामस्थांची आरोग्य तपासणी करण्याचा निर्णय घेण्यात आला. निरवडे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या डॉक्टर व कर्मचाऱ्यांकडून तब्बल पन्नास ग्रामस्थांची आरोग्य तपासणी करत औषध उपचार करण्यात आले. यावेळी प्राथमिक आरोग्य केंद्रातील औषधा सोबतच बाहेरील औषधे ग्रामपंचायतीच्या माध्यमातून मोफत पुरविण्यात आली.
यावेळी आरोग्य विभागाचे वैदयकीय अधिकारी श्रीम. सुप्रिया धाकोरकर, श्रीम. प्रियांका कासार , आरोग्य सेविका श्रीम. एस. डी नाईक, आरोग्य सेवक श्री. एस. एस. कुबल ग्रामपंचायत सदस्य मळगांव, ग्रामविकास अधिकारी श्रीम.एम.एम. बांदेकर, आशा सेविका, अंगणवाडी सेविका, ग्रामपंचायत कर्मचारी यावेळी उपस्थित होते. शिबिर आयोजित करून आरोग्याची खबरदारी घेतल्याने मळगांव गावातील ग्रामस्थांमधुन समाधान व्यक्त करण्यात आले.
