ठाकरे गटाच्या ग्रामपंचायत उमेदवार आणि जिल्हा परिषद शाळा रामेश्वर च्या मा व्यवस्थापन समिती अध्यक्ष नंदिनी पराडकर यांचा शिंदे शिवसेना पक्षात प्रवेश…
कणकवली ता.०५-:
शिवसेना जिल्हाप्रमुख संजय आंग्रे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या नंदिनी पराडकर यांनी शिंदे गट शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला. युवा सेना जिल्हाप्रमुख सुकांत वरुणकर ,उपतालुक प्रमुख मंगेश गुरव आणि खारेपाटण सरपंच प्राची इसवलकर यांच्या नेतृत्वाखाली तसेच यांच्या कार्याने प्रेरित होऊन सौ.पराडकर यांनी शिंदे गट शिवसेना पक्षात प्रवेश केला.
यावेळी जिल्हाप्रमुख संजय आंग्रे ,महिला जिल्हाप्रमुख वर्षा कुडाळकर विधानसभा संपर्क प्रमुख -संदेश पटेल
जिल्हाप्रमुख सचिव किसन मांजरेकर,उपजिल्हा प्रमुख-हरेश पाटील खजिनदार -भास्कर राणे, तालुकाप्रमुख- भूषण परुळेकर हे उपस्थित होते.
तसेच यावेळी खारेपाटण सरपंच प्राची इसवलकर ,कृषी बाजार उत्पन्न समिती चे संचालक- मंगेश ब्रह्मदंडे ,ग्रामपंचायत सदस्य-गुरू शिंदे, सुधाकर ढेकणे उपस्थित होते.
