युवा सेनेच्यावतीने विद्युत वितरणचे कार्यकारी अभियंता यांच्याकडे मागणी
⚡कणकवली ता.०५-: कलमठ गावातील वीज समस्या बाबत वारंवार अर्ज करून देखील वीज समस्या सोडवली जात नाही. यामुळे कलमठ गावात वारंवार वीज खंडित होवून नागरिकांना अडचणींना सामोरे जावे लागत आहे. वीज समस्या मार्गी लागावी यासाठी ठाकरे युवा सेनेच्या वतीने विद्युत वितरणच्या कार्यालयाला धडक दिली. कार्यकारी अभियंता बाळासाहेब मोहिते यांना याबाबतचे निवेदन देत लक्ष वेधले.
यावेळी युवासेना जिल्हाप्रमुख
सुशांत नाईक,कलमठ विभाग प्रमुख अनुप वारंग, कलमठ युवासेना शहरप्रमुख धिरज मेस्त्री ग्रा.प.सदस्य सचिन खोचरे, कणकवली तालुका संघटक नितेश भोगले, माजी सरपंच निसार शेख,विलास गुडेकर आदी सेनेचे पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.
दिलेल्या निवेदनात ते म्हणतात,
गणपती आणि गोपाळकाला आणि त्या नंतर सुरू होणारे सण यांच्या अनुषंगाने विजेचे होणारा नेहमीचा खेळ खंडोबा थांबवण्यात यावा यासाठी योग्य त्या उपाययोजना कराव्यात. जेणेकरून वारंवार विजेवीणा होणारी नागरिकांची गैरसोय टळावी. तसेच उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खास.विनायक राऊत यांच्या शिफारशीनुसार मंजुर झालेला ट्रान्सफॉर्मर लवकरच कलमठ बिडयेवाडी मध्ये चालू करावा. कार्यकारी अभियंता मोहिते यांनी गणेशोत्सवपूर्वी आपल्या या समस्या मार्गी लावल्या जातील तसेच ट्रान्सफॉर्मर चे काम निखिल लवकरात लवकर पूर्ण करून देण्याची ग्वाही दिली.
