न्हावेलीतील रस्ता कामगार
सुरेश नागवेकर यांचे निधन

⚡बांदा ता.०४-: न्हावेली रेवटेवाडी येथील सुरेश बाबाजी नागवेकर (वय72) यांचे हृदय विकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांनी अनेक वर्षे सार्वजनिक बांधकाम विभागात रस्ता कामगार म्हणून काम केले असून ते सेवानिवृत्त झाले होते. परिसरात सर्वांशी आपुलकीने बोलणारा व्यक्ती अचानक गेल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या पच्छात पत्नी, मुलगे, विवाहित मुली, जावई, नातवंडे असा परिवार आहे. न्हावेली ग्रामपंचायत माजी सदस्य सुशील नागवेकर यांचे ते वडिल होत.

You cannot copy content of this page