कांदळगाव येथील नारळ लढविणे स्पर्धेत अंकुश सावंत विजयी…

⚡मालवण ता.०३-: भाजप कांदळगावच्यावतीने कांदळगाव येथील रामेश्वर मंदिरच्या प्रांगणात आयोजित करण्यात आलेल्या नारळ लढविणे स्पर्धेत अंकुश सावंत (कांदळगाव) हे विजयी झाले. तर जयेश शिरपूटे (मालवण) हे उपविजेते ठरले.

या स्पर्धेत ८० जणांनी सहभाग घेतला. स्पर्धेतील विजेत्या कांदळगाव येथील अंकुश सावंत यांना रोख ६६६६ रुपये व चषक तर उपविजेत्या मालवणच्या जयेश शिरपूटे याला रोख रु. ३३३३ व चषक देऊन गौरविण्यात आले. यावेळी कांदळगावचे सरपंच रणजित परब, ग्रा.पं. सदस्य संतोष पारकर, विहार कोदे, शारदा मुळये, राजेंद्र कदम, शामसुंदर मुळये, बाबी परब, भूषण सुर्वे, गौरव कोदे, आबा साळकर, भाजप कांदळगाव प्रभारी प्रसाद भोगले, अमोल वारंग, मनोज आचरेकर, राजू पावसकर, मिहीर कोदे, शिवराम परब, संतोष मुसळे, शामू कांदळगावकर, बाबू नारिंग्रेकर, राकेश कदम, गुरु मांजरेकर, आदी उपस्थित होते. उमेश कोदे, प्रवीण पारकर, गोपी मालवणकर यांनी स्पर्धेचे सूत्रसंचालन व समालोचन केले.

You cannot copy content of this page