राज्य केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन सहसचिव पदी झाली बिनविरोध निवड:राजा शिवाजी चौक मित्र मंडळाच्यावतीने आयोजन
⚡सावंतवाडी ता.०१-: राजा शिवाजी चौक मित्र मंडळाच्या वतीने अहिल्या मेडिकल स्टोरचे मालक तसेच राजा शिवाजी चौक मित्र मंडळाचे आनंदीजी रासन यांची महाराष्ट्र राज्य केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन मुंबई झोन सहसचिव पदी बिनविरोधी निवड झाल्याबद्दल मंडळाचे सल्लागार व माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी मंडळाचे अध्यक्ष बंटी माठेकर, माजी नगरसेवक सुरेश भोगटे, विलास जाधव, अभय पंडित, मंडळाचे उपाध्यक्ष दिलीप पवार, बंड्या तोरस्कर, अरुण घाडी, सचिव दीपक सावंत, सहसचिव महादेव राऊळ, ज्येष्ठ पत्रकार सिताराम गावडे, रत्नाकर माळी, सोन्या कासार, प्रदीप नाईक उमेश खटावकर रवी जाधव व मंडळाचे सर्व कार्यकर्ते उपस्थित होते.
दरम्यान साळगावकरांनी यांनी त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
