शिक्षणमंत्री केसरकर यांच्या शिफारशीने तिन्ही तालुक्यांना निधी:जिल्हाप्रमुख अशोक दळवी यांची माहिती
⚡सावंतवाडी ता.०१-:* सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील विविध विकास कामांना निधी मिळावा यासाठी शासन स्तरावर लेखी मागणी केल्यानुसार मतदारसंघासाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेअंतर्गत शिक्षण मंत्री तथा आमदार श्री दीपक केसरकर यांच्या शिफारशीनुसार 23- 24 या वर्षासाठी सावंतवाडी नगरपरिषद, वेंगुर्ला नगरपरिषद, सावंतवाडी वेंगुर्ला दोडामार ग्रामीण भागातील गांवे अर्थसंकल्पीय तरतुदीनुसार ग्रामीण भागातील विविध विकास कामांना सुमारे ५ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. याबाबतची माहिती जिल्हाप्रमुख अशोक दळवी यांनी दिली आहे.
