असलदे तंटामुक्त गाव समिती अध्यक्षपदी मनोहर प्रभूखोत

निवडणूक टाळण्यासाठी ईश्वर चिठ्ठीद्वारे निवड

⚡कणकवली ता.०१-:
असलदे तंटामुक्त गाव समितीत अध्यक्ष पदासाठी ५ जण इच्छूक असल्याने गावात अध्यक्षपदाची निवडणूक बिनविरोध व्हावी , सर्व वाडीतील सदस्यांना काम करण्याची संधी मिळावी असा निर्णय ग्रामसभेत घेण्यात आला. त्यानुसार तंटामुक्त अध्यक्षपदासाठी इच्छूक असलेल्या ५ उमेदवारांमध्ये ईश्वर चिठ्ठीद्वारे मनोहर प्रभूखोत यांची निवड बिनविरोध करण्यात आली आहे. तसेच संपुर्ण समिती गठीत करण्यात आली आहे.

असलदे ग्रामपंचायत ग्रामसभा रामेश्वर सभागृहात सरपंच चंद्रकात डामरे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी उपसरपंच सचिन परब , सोसायटी चेअरमन भगवान लोके, ग्रा.प. सदस्य दयानंद हडकर , आनंद तांबे, विद्या आचरेकर , आनंदी खरात , स्वप्ना डामरे, सुवर्णा दळवी , ग्रामसेवक संजय तांबे आदींसह आरोग्य सेविका खानोलकर, आशा सेविका भाग्यश्री नरे, कृषी सहाय्यक शिवाजी बुधवळे आदींसह गावतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या ग्रामसभेत मोदी आवास योजनेची माहिती ग्रामस्थांना देण्यात आली. तसेच एम.आर.जी.एस योजनेअंतर्गत काजू लागवड लाभार्थी यादी निश्चित करण्यात आली. देवगड निपाणी रस्ता ते रामेश्वर मंदिराकडे जाणारा मुख्य रस्ता दीड किलोमिटर मंजूर केल्याबद्दल सार्वजनिक बांधकाम मंत्री,पालकमंत्री रविंद्र चव्हाण,स्थानिक आ.नितेश राणे,सरपंच चंद्रकांत डामरे,माजी सरपंच पंढरी वायंगणकर यांच्या अभिनंदनाचा ठराव पत्रकार भगवान लोके यांनी मांडला.दोन्ही ठराव मंजूर करण्यात आले.

त्यानंतर तंटामुक्त समिती गठीत करण्यात आली.त्यामध्ये अध्यक्ष मनोहर प्रभुखोत,पोलीस पाटील तथा निमंत्रक सावित्री पाताडे,उपसरपंच सचिन परब , सोसायटी चेअरमन भगवान लोके, ग्रा.प. सदस्य दयानंद हडकर , विद्या आचरेकर , आनंदी खरात , स्वप्ना डामरे, सुवर्णा दळवी , पत्रकार भगवान लोके,अनंत पाताडे,गुरुप्रसाद वायंगणकर,उदय परब ,संजय डगरे , रघुनाथ लोके, प्रदिप हरमलकर , महेश लोके, , रुपेश खरात , प्रविण डगरे, संतोष परब , लक्ष्मण लोके , संतोष घाडी , दिनेश शिंदे , देवू डामरे , विजय डामरे, वासुदेव दळवी , विलास जांभळे, जयप्रकाश पाताडे, सुरेश सुतार, प्रशांत कदम, विनोद तांबे व अन्य सदस्य, पदसिद्ध सदस्य निवड करण्यात आली आहे.

या निवडीनंतर नूतन तंटामुक्त समिती अध्यक्ष मनोहर प्रभुखोत व माजी अध्यक्ष बाबाजी शिंदे यांचा सरपंच चंद्रकांत डामरे, सोसायटी चेअरमन भगवान लोके यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

You cannot copy content of this page