बुद्धिबळ स्पर्धेत कासार्डेचा गौरव‌ कुडतरकर प्रथम तर दर्शन पांचाळ तृतीय

⚡कणकवली ता.२९-: क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व क्रीडा परिषद सिंधुदुर्गद्वारा आयोजित कणकवली तालुकास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत कासार्डे ज्यु. कॉलेजमधील इ. १२ वी सायन्सचा खेळाडू गौरव किशोर कुडतरकर याने १९ वर्षे वयोगटात कणकवली तालुकास्तरावर विजेते पद पटकावले तर, १४ वर्षे वयोगटात कु.-दर्शन अनंत पांचाळ- ८ वी(ब)याने तृतीय क्रमांक प्राप्त केला आहे.


तालुकास्तरीय बुध्दिबळ स्पर्धा नुकतीच विद्यामंदिर कणकवली येथे पार पडली.या यशस्वी खेळाडूंची कनेडी येथे 31ऑगस्ट रोजी होणाऱ्या जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
या खेळाडूंना प्रा.विनायक पाताडे,अनंत काणेकर, अवधूत कानकेकर, क्रीडा शिक्षक दत्तात्रय मारकड,प्रा.दिवाकर पवार व क्रीडा विभाग इतर शिक्षकांचे बहुमोल मार्गदर्शन लाभले आहे.
या यशस्वी खेळाडू तसेच मार्गदर्शक शिक्षकांचे कासार्डे विकास मंडळ मुंबईचे अध्यक्ष परशुराम माईणकर, सरचिटणीस रोहिदास नकाशे,स्थानिक व्यवस्था समितीचे कार्याध्यक्ष संजय पाताडे, शाळा समिती चेअरमन अरविंद कुडतरकर, प्राचार्य एम.डी. खाडये, पर्यवेक्षक एन.सी. कुचेकर व जेष्ठ शिक्षिका सौ. बी .बी. बिसुरे यांनी अभिनंदन करुन पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

You cannot copy content of this page