किरण मेस्त्रीनी पटकवला प्रथम क्रमांक:आमदार वैभव नाईक यांच्या संकल्पनेतून आयोजन..
⚡मालवण ता.२७-: आमदार वैभव नाईक यांच्या संकल्पनेतून युवासेना मसुरे विभागाने
मसुरे देऊळवाडा येथे आयोजित केलेल्या नारळ लढविणे स्पर्धेत
किरण मेस्त्री याने विजेतेपद पटकाविले विजेत्या किरण मेस्त्री याला रोख पाच हजार रुपये व चषक देऊन गौरविण्यात आले
युवासेना मसुरे विभागाने मसुरे देऊळवाडा येथे नारळ लढवणे स्पर्धा आयोजित केली होती. या स्पर्धेस उत्स्फुर्त प्रतीसाद मिळाला. स्पर्धेत १५० स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. प्रत्येक स्पर्धकाला ५ नारळ देऊन स्पर्धा आयोजित केली गेली. यावेळी स्पर्धेचे प्रमुख पाहुणे मुंबई सुधार समिती अध्यक्ष व वांद्रे विधानसभा प्रमुख सदा परब यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. युवासेना जिल्हा प्रमुख व कुडाळ चे उपनगराध्यक्ष युवासेना सचिव मंदार शिरसाठ व माजी मालवण नगरसेवक मंदार केणी यांनी नारळ लढवून स्पर्धेस सूरुवात केली. स्पर्धेचा विजेता प्रथम मानकरी किरण मेस्त्री याला रोख रु ५००० व चषक आणि उपविजेता द्वितीय मानकरी ठरला भार्गव वरक याला रोख रू ३००० व चषक देऊन सन्मानित करण्यात आले.
यावेळी मसुरे विभाग प्रमुख पिंट्या गावकर, गोळवन विभाग प्रमुख भाऊ चव्हाण, रेवंडी सरपंच अमोल वस्त, संदीप महाडेश्वर, उपतालुका प्रमुख युवासेना अमित भोगले, युवासेना विभाग प्रमुख राहूल सावंत, युवासेना शाखा प्रमुख पप्पू परब, किशोर कसले, निलेश मालवणकर, आयवण फर्नांडिस, बाबू आंगणे, तनुराज आंगणे व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
