खालची कुंभारवाडी, कुडाळ येथे आयोजित आरोग्य शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

कामगार कल्याण केंद्र, कुडाळ आणि कुडाळ नगरपंचायतचे नगरसेवक उदय मांजरेकर यांचे आयोजन

⚡कुडाळ ता.२७-: महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ, गट कार्यालय चिपळूण अंतर्गत कामगार कल्याण केंद्र, कुडाळ आणि कुडाळ नगरपंचायतचे नगरसेवक उदय रामचंद्र मांजरेकर यांच्या संयुक्त विद्यमाने आज इमारत बांधकाम आणि इतर कामगारासाठी तसेच वॉर्डमधील नागरिकांसाठी आरोग्य तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले होते. हे शिबिर ब्राम्हणदेव, खालची कुंभारवाडी, कुडाळ येथे संपन्न झाले. या शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या शिबिरात सीबीसी (एचबी), थायरॉईड, कॅल्शियम, शुगर, बी.पी. तपासणी पूर्णतः मोफत करण्यात आले. या शिबिराचा ६९ जणांच्या आरोग्य विषयक टेस्ट करण्यात आल्या.


या आरोग्य शिबिराचे उद्घाटन कुडाळच्या नगराध्यक्षा अक्षता खटावकर यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी नगराध्यक्षा अक्षता खटावकर म्हणाल्या की, महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ (कुडाळ) आणि नगरसेवक उदय मांजरेकर यांनी राबविलेला हा आरोग्य शिबिर उपक्रम स्तुत्य आहे. या शिबिरातून कामगार तसेच स्थानिक नागरिकांना याचा फायदा झाला. यात अतिशय महत्त्वाच्या आरोग्य विषयक टेस्ट पूर्णतः मोफत करण्यात आल्याने नागरिकांना याचा फायदा झाला. अशाप्रकारची आरोग्य शिबिरे राबवून नगरसेवक उदय मांजरेकर यांनी समाजकार्याचा वसा कायम ठेवला आहे.
तर माजी उपनगराध्यक्ष मंदार शिरसाट म्हणाले की, अशा आरोग्य शिबिरामुळे सामान्य नागरिकांना फायदा होतो. आजच्या धकाधकीच्या काळात आपल्या आरोग्याकडे काळजीपूर्वक लक्ष देणे महत्त्वाचे ठरते. कामगार कल्याण मंडळ, कुडाळ आणि नगरसेवक उदय मांजरेकर यांनी दिलेल्या या योगदानाबद्दल मंदार शिरसाट यांनी त्यांचे आभार मानले.
यावेळी नगरसेवक किरण शिंदे, नगरसेवक संतोष शिरसाट, नगरसेविका श्रेया गवंडे, नगरसेविका श्रुती वर्दम,
नगरसेविका ज्योती जळवी, कल्याण केंद्र कुडाळ केंद्रप्रमुख सुस्मिता नाईक, पंचायत समिती सुपरवायझर डॉ. महादेव तेली, महालॅब प्रमुख डॉ. प्रशांत जाधव, आरोग्यसेवक व्ही. एन. आरोसकर, आरोग्य सहाय्यक पंचायत समिती कुडाळ रवी गावडे, प्रतिभा गुंडप, सोनाली गोरे, आरोग्यसेविका आरती भरतू, हिंद लॅब नर्स मृणाली कदम, हिंद लॅब नर्स कांचन परब, आरोग्यसेविका रिधिमा गरुड, आशा स्वयंसेविका शिल्पा कुंभार, अंगणवाडी सेविका दीपिका साटम, अंगणवाडी सेविका अक्षता जाधव, श्री देव ब्राम्हण मंडळ अध्यक्ष शेखर कुंभार, दादा कुंभार, लाडू कुंभार, बबन कुंभार, दादा तळवडेकर, अमोल तळवडेकर, ॲड. महादेव कुंभार, बंड्या मांजरेकर, रितेश मांजरेकर, अमर कुंभार, बाळू कुंभार, वैभव घाडी, रामदास कुंभार, गजानन पंडित, रामदास पंडित, सिद्धेश परब, संकेत कुंभार, निलेश कुंभार, दशरथ कुंभार आदी स्थानिक ग्रामस्थ उपस्थित होते. तसेच या आरोग्य शिबिरास उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे पदाधिकारी
तालुकाप्रमुख राजन नाईक, अतुल बंगे, राजू गवंडे, संदीप महाडेश्वर, सचिन काळप, सुशील चिंदरकर, स्वप्निल शिंदे, राकेश वर्दम आदी मान्यवरांनी सदिच्छा भेट दिली.

You cannot copy content of this page