रुग्णांनी लाभ घ्यावा; राजू मसुरकर यांचे आवाहन..
⚡सावंतवाडी ता.२७-: येथील दि.०३ सप्टेंबर रोजी महाआरोग्य शिबिर सावंतवाडी माठेवाडा आत्मेश्वर मंदिर पाठीमागे श्री स्वामी समर्थ कॉम्प्लेक्स स्नेहदीप हॉटेल शेजारी जीवन रक्षा वैद्यकीय प्रतिष्ठान तसेच कोल्हापूर अथायु मल्टिपेशालिस्ट हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.हे शिबिर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रुग्णांसाठी आयोजित केले असून सदर महाआरोग्य शिबिराचा रुग्णांनी लाभ घेण्यात यावा असे आवाहन जीवन रक्षा वैद्यकीय क प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजू मसुरकर यांनी केले आहे.
दरम्यान पिवळे केसरी अंत्योदय व अन्नपूर्णा रेशनिंग कार्ड तसेच आधार कार्ड किंवा मतदान कार्ड असणे आवश्यक आहे येताना सर्व प्रकारचे आरोग्य तपासणी रिपोर्ट तपासणीच्या वेळी घेऊन येण्यात यावे असे आवाहन देखील राजू मसुरकर यांनी केले आहे.

हे शिबिर सकाळी 12 ते 04 वाजेपर्यंत हे महाआरोग्य शिबिर होणार आहे तपासणी झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी रुग्णांना मोफत बस सेवा शस्त्रक्रिया करण्यासाठी सावंतवाडी ते कोल्हापूर येथे आयोजीत करण्यात आले आहे रुग्णांची मोफत शस्त्रक्रिया औषधे व जेवण याचा सुध्दा मोफत लाभ रुग्णांना मिळणार आहे असे ही मसुरकर यांनी यावेळी सांगितल.
या शिबिराचे लाभ सिंधुदुर्गवासीयांनी व सावंतवाडी तालुक्यातील रुग्णांनी मोफत घेण्यात यावा नोंदणीसाठी संपर्क ९४२२४३५७६० – राजु मसुरकर सकाळी अकरा ते एक व सायंकाळी ४ ते ७ या वेळेत नोंदणी करण्यात यावी असे ही त्यांनी यावेळी सांगितले.
