महिलांनी सैनिकांना पाठविली राखी…

कोळंब न्हिवे, खैदा, कातवड, आडारी, खडवन नाका येथील महिलांचा उपक्रम..

मालवण दि प्रतिनिधी

ग्रामस्थांमध्ये देशप्रेम, सैनिकप्रेम जागृत व्हावे, यासाठी कोळंब, न्हिवे, खैदा, कातवड आडारी व खडवन नाका परिसरातील महिला व विद्यार्थिनींनी ‘एक राखी सैनिकांसाठी- सीमेवरच्या भावांसाठी’ या उपक्रमांतर्गत सैनिकांना ३५० राख्या व संदेश पाठविण्यात आले. त्यांनी देशाच्या रक्षणासाठी सदैव तत्पर असलेल्या जवानांना पोस्टाद्वारे राख्या पाठवून सैनिकांप्रती असलेला आदर द्विगुणीत केला. कोळंब येथील महिलांनी तयार केलेल्या राख्या कमांडिंग ऑफिसर कार्यालय मुंबई व गोवा येथे पाठविण्यात आल्या. या उपक्रमाचे कौतुक होत आहे.

You cannot copy content of this page