नेरूर गणेशवाडी येथे उद्धव ठाकरे गटाला धक्का

⚡कुडाळ ता.२५-: भारतीय जनता पार्टीच्या विचारसरणीला आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे, पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या विकासकामे करण्याच्या कार्यपद्धतीवर प्रेरित होऊन माजी खासदार निलेश राणे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून नेरूर गणेशवाडी येथील ठाकरे गटातील शेखर मुळम आणि कार्यकर्त्यांचा भाजपामध्ये प्रवेश झाला.


यावेळी भारतीय जनता पार्टी जिल्हा उपाध्यक्ष रणजित देसाई, जिल्हा कोषाध्यक्ष चारुदत्त देसाई, जिल्हा चिटणीस विनायक राणे, तालुकाध्यक्ष संजय वेंगुर्लेकर, युवामोर्चा अध्यक्ष कुडाळ रुपेश कानडे, युवामोर्चा अध्यक्ष ओरोस पप्या तवटे, माजी पंचायत समिती सदस्य संदेश नाईक, सोशल मीडियाप्रमुख राम बांदेलकर आदी पदाधिकारी यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. प
यावेळी शेखर मुळम यांच्या नेतृत्वाखाली कृष्णा मुळम, आत्माराम मुळम, बंड्या मुळम, प्रशांत मुळम, अक्षय मुळम, वासुदेव मुळम, अनिशा मुळम, जान्हवी मुळम, रिया मुळम, क्रिश मुळम, तुकाराम मुळम, प्रिया मुळम, संकल्प मुळम, योगेश मुळम, सुरेश मुळम, बाळा मुळम, चेतन मुळम, रसिका मुळम, विजया मुळम, अनिकेत मुळम, सुजाता मुळम, प्रणती मुळम, चैताली मुळम, लतिका मुळम, लक्ष्मण मुळम यांनी प्रवेश केला.
यावेळी भारतीय जनता पार्टी वार्ड क्रमांक ५ चे प्रमुख पदाधिकारी नेरुर माजी उपसरपंच शाम गावडे, बुथ अध्यक्ष जयराम परब, सुरजित गावडे, किशोर गावडे, देवा गावडे, मंगेश राऊत, अक्षय देसाई, सिध्देश देसाई, प्रभाकर देसाई, सचिन सडवेलकर, दादा गावडे, चिन्मय राणे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

You cannot copy content of this page