वेंगुर्ला चर्मकार समाज उन्नती मंडळाचा २७ रोजी स्नेहमेळावा

⚡वेंगुर्ला ता.२५-: सिंधुदुर्ग जिल्हा चर्मकार समाज उन्नती मंडळ शाखा वेंगुर्ल्याचा समाज स्नेहमेळावा रविवार दि. २७ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता येथील साई डिलक्स हॉल येथे होणार आहे. या मेळाव्याला बिहारचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर व राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांची पमुख उपस्थिती असणार आहे.


वेंगुर्ला शाखेचे अध्यक्ष सहदेव शिरोडकर यांच्या अध्यक्षतेखाली होणा-या या स्नेहमेळाव्यास पेडणे (गोवा)चे आमदार प्रविण आर्लेकर, निवृत्त आरटीओ अधिकारी विनोद आर्लेकर, अर्चना फाऊंडेशनच्या अध्यक्ष अर्चना घारे-परब, शिवसेनेचे जिल्हा समन्व्यक सचिन वालावलकर, जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण सभापती नीलेश सामंत, सिंधुदुर्ग जिल्हा चर्मकार समाज मंडळाचे अध्यक्ष सुजित जाधव, सचिव चंद्रसेन पाताडे, उद्योजक विष्णुदास कोरगावकर यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. माजी जिल्हाध्यक्ष अॅड.नंदन वेंगुर्लेकर, अॅड.अनिल निरवडेकर, कुडाळचे बिडीओ विजय चव्हाण, आत्माराम ओटवणेकर, सार्वजनिक बांधकामचे निवृत्त अभियंता प्रकाश चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेसचे नवीमुंबई जिल्हा सचिव महेश शिरोडकर, शासकीय-निमशासकीय बँकेचे संचालक उदय शिरोडकर, वेंगुर्ला चर्मकार समाजचे माजी अध्यक्ष उत्तम चव्हाण, माजी सचिव गुरुप्रसाद चव्हाण आदी उपस्थित राहणार आहेत.
या मेळाव्यात वेंगुर्ल्यातील चर्मकार समाजातील शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ, दहावी, बारावी, पदवी परीक्षेतील गुणवंत विद्यार्थी व विशेष प्राविण्य प्राप्त विद्यार्थ्यांचा सत्कार उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार आहे. कर्तृत्ववान समाजबांधव, यावर्षी सेवानिवृत्त झालेले अधिकारी, कर्मचारी, महिला बचत गटांच्या पदाधिकारी, राजकारणात पदप्राप्त समाजबांधव, आंतरजातीय विवाह करणारी जोडपी व गेली पंधरा वर्ष एकत्र नांदणा-या सासू-सुनांचा सत्कारही मान्यवरांच्या हस्ते केला जाणार आहे.
या मेळाव्यास वेंगुर्ला तालुक्यातील समाजबांधवानी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन अध्यक्ष सहदेव शिरोडकर व सचिव महेश चव्हाण यांनी केले आहे.

You cannot copy content of this page